टिकटॉकला अजून मोठा झटका

बिजिंग – भारताची चीनने गलवान खोऱ्यात कुरापत काढल्यानंतर मोठी हिंसक झडप झाली. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर केंद्र सरकारकडून अनेक चीनी ॲप भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्यात आली. त्यामध्ये टीकटॉकचाही समावेश होता. त्यामुळे टिकटॉकला जबर किंमत मोजावी लागली. यानंतर आता आणखी एक जबर हादरा TikTok ला बसला आहे. TikTok चे सीईओ केवीन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेच्या प्रचंड दबावाखाली त्यांनी राजीनामा दिला आहे. TikTok ॲप विकण्यासाठी अमेरिकेकडून दबावतंत्र सुरु आहे.
मेयर यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय वातावरण अचानक ढवळून निघाल्याने सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मेयर यांनी हा निर्णय घेतला आहे. TikTok ची मूळ कंपनी असलेल्या ByteDance ला ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन बाजारपेठ अमेरिकन कंपनीला न विकल्यास ९० दिवसांत TikTok बॅन करण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव TikTok अमेरिकेतून चालवण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here