पोलीस तक्रार दाखल करताच रुग्ण हक्क परिषदेचा नामफलक पुन्हा दिमाखात उभा

  • बुलंद पोलिस टाईम्सच्या बातमीची दखल
  • रात्री गायब झालेला बोर्ड सकाळी पुन्हा जागेवर उभा

पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – पुण्यातील धानोरी येथील रुग्ण हक्क परिषदेचा नामफलक मंगळवारी रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी कापून नेला होता. याबाबत नागरिकांनी काही संशयित व्यक्तींची नावे रुग्ण हक्क परिषदेकडे दिली होती. त्यानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बोर्ड चोरी झाल्याची तक्रार दिली होती. मात्र तक्रार दिल्याविषयी व्हायरल झालेल्या बातमीमुळे पुन्हा एकदा नामफलक जसाच्या तसा उभा करण्यात आलेला दिसून आला.
पुन्हा एकदा बोर्ड उभा असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला. सत्याचा विजय आहे. रुग्ण हक्क परिषदेचा नैतिक धाक आणि दरारा असल्याचे आम्ही अनुभवले असे पुणे शहराध्यक्ष मनीषा तिखे म्हणाल्या. रात्री उशिरा गायब झालेला बोर्ड पुन्हा सकाळी लावलेला दिसताच आज पुन्हा एकदा शाखेच्या नामफलकाचे पूजन करण्यात आले. शहराध्यक्ष मनीषा तिखे यांनी पुष्पहार अर्पण केला, तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय गायकवाड यांनी नारळ फोडून पूजन केले. यावेळी धानोरी शाखा अध्यक्ष मनोज बराथे, पुणे शहर उपाध्यक्ष माऊली जाधव, पुणे शहर सचिव आसमा सय्यद, संगीता वांजळे उपस्थित होत्या. रूग्ण हक्क परिषदेचा निर्जीव भाग असो की सजीव त्यास हात लावला तर सहन करणार नाही. चोख प्रत्युत्तर देऊ असेही शहराध्यक्ष तिखे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here