
कोल्हापूर (नियाज जमादार) – प्रभाग क्रमांक ७९, सुर्वेनगर या प्रभागांमध्ये कोल्हापूर महानगरपालिका व नगरसेविका सौ मेघा आशिष पाटील यांच्या प्रभागांमध्ये घरगुती बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती असलेल्या गणरायाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. कोरोनामुळे दरवर्षी गणेश विसर्जनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका, वाद्यांच्या आणि डीजेचा धिंगाणा याला पूर्णविराम देण्यात आला होता. कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी व आधिकारी व तसेच तरुण मंडळे व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले तसेच नगरसेविका सौ.मेघा आशिष पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, गणेशभक्तांचे आभार मानले आहे.








