अहमदनगर (भरत पवार) – कोल्हापूर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या सावला टोळीचा मोरक्या प्रकाश उर्फ पप्पू सावला (वय ६५ रा. वेस्ट बोरिवली, मुंबई) याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने बुधवार (ता.१७) फेटाळला या निकालामुळे कोल्हापुरातील मुल्ला, कोराने तसेच इचलकरंजीतील अग्रवाल यांना मोठा झटका बसला आहे.
महाराष्ट्रासह आठ राज्यात मटक्याची रॅकेट निर्माण केलेल्या सावला टोळीतील प्रकाश उर्फ पप्पू तसेच त्याचा मुलगा वीरेंद्र सावला याच्यासह ३४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आले आहे. त्यापैकी ३२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रकाश उर्फ पप्पू सावला आणि मटका बुकी सम्राट कोराणे वर्षभरापासून फरारी आहेत. अटकेची कारवाई टाळण्यासाठी प्रकाश सावला याने विशेष मोक्का न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.
त्यावर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती तपास अधिकारी तथा शहर पोलीस उपाध्यक्ष प्रेरणा कट्टे यांनी हरकत घेऊन सावला याच्या अर्जाला विरोध केला होता. दरम्यान पोलिसांना चकवा देत असलेल्या सम्राट कोराणे याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी विशेष पथकाला आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याचा शोध सुरू आहे असेही कट्टे यांनी सांगितले.






