लंडन (वृत्तसंस्था) – सोशल मीडियात एक चित्र व्हायरल झाले असून, त्याला तैवानमधील ‘तैवान टाईम्स’ या दैनिकाने ‘फोटो ऑफ द डे’चा मान दिला आहे. या चित्रावर ‘भारताच्या रामाने चीनच्या ड्रॅगनला मारले,’ अशी ओळ तैवान टाईम्सने लिहिली आहे.
हे चित्र हाँगकाँगमधील ट्विटर यूझर होसाई लेई यांनी शेअर केले. अनेक भारतीयांनी होसाई लेई यांचे आभार त्याबद्दल मानले. होसाई यांनी उत्तरात लिहिले, आम्ही (तैवान, हाँगकाँग) भारताचे समर्थक आहोत. गलवान खोर्यात सोमवारी झालेल्या भारत-चीन धुमश्चक्रीची दखल जगभरातील माध्यमांमध्ये लागोपाठ दुसर्या दिवशीही महत्त्वाचा विषय बनलेली आहे. धुमश्चक्रीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीनला प्रत्युत्तर देण्याचा दबाव वाढलेला आहे, असे ‘सीएनएन’ने म्हटले आहे. भारत-चीनदरम्यान चकमकी लवकर आटोपण्याची चिन्हे नाहीत, अशी शंका ब्रिटिश दैनिक ‘द गार्जियन’ने व्यक्त केली आहे.






