मुंबई : कुर्ला पश्चिम येथील सीएसटी मार्गावरील मेहता इमारतीचा काही भाग कोसळला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने इमारतीचा जो भाग कोसळला त्या भागात कोणीच राहत नसल्याने जीवितहानी टळली. जानेवारी महिन्यात या इमारतीत मोठी आग लागली होती. यानंतर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आजुबाजूच्या नागरिकांना काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज आला. यानंतर इमारतीचा काही भाग असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. यावेळी अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचले परंतु इमारतीत कोणीच राहत नसल्याने हानी टळली.






