माहिमवासियांची कोरोना योध्द्यांना अनोखी मानवंदना

मुंबई- कोरोना व्हायरसच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणारे कोरोना योद्धांना माहिम रेल्वे स्थानकात अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. यासाठी स्थानकावर चित्र रेखाटण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस, भाजी विक्रेते, डिलिव्हरी व्यक्ती आणि स्वच्छता कामगार ज्यांनी आपली भूमिका चोख बजावली यांचे या चित्रांद्वारे आभार मानण्यात आलेत.
माहीम स्टेशनची सीमा भिंत जीर्ण अवस्थेत होती म्हणून प्रथम त्याची दुरुस्त करण्यात आली आणि नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्यासाठी एशियन पेंट्स आणि सेंट + आर्ट इंडिया फाऊंडेशनशी संपर्क साधला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. बीएमसी फूट ओव्हर ब्रिजला जोडलेला 3.6 मीटर रुंद आणि 80 मीटर लांबीचा नवीन स्काय वॉकही नुकताच महिममध्ये एमआरव्हीसीने (MRVC) बांधला आहे.
हा प्रकल्प केवळ स्टेशनचे सौंदर्यीकरणच वाढवत नसून कोविड-19च्या योद्धांबद्दल ऐक्य आणि कृतज्ञता देखील व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग असल्याचं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. माहिम जंक्शन स्टेशनवर सुमारे दिड लाख सामान्य नागरिक दररोज या मार्गावरुन प्रवास करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here