पवित्र ग्रंथ उलट अक्षरात लिहिण्याचा विक्रम; इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्हा नंदुरबार येथील शहादा तालुक्यातील म्हसावद येथील शिक्षकाने कोरोना काळाचा सदुपयोग करत २० तास १५ मिनिटात संस्कृत मधील श्रीमद भगवद्गगीता व श्री हनुमान चालीसा उलटया अक्षरात म्हणजेच मिरर रायटिंग मध्ये लिहून एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल वंडर बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत लाॅकडॉऊन कालावधीचा सदुपयोग करित म्हसावद येथील शिक्षक श्री.सुधाकर सजन पाटील यांनी 2 एप्रिल 2020 श्रीराम नवमी ते 8 एप्रिल 2020 श्री हनुमान जयंती या सात दिवसाच्या काळात 20 तास 15 मिनिटे घेऊन संस्कृत मधील श्रीमद् भगवद्गगीता व श्री.हनुमान चालीसा उलट्या अक्षरात म्हणजेच मिरर रायटिंग मध्ये लिहून एक अनोखा विक्रम केला आहे. या त्यांच्या अनोख्या विक्रमाची दखल घेत इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकात अप्रतिम विक्रम व रिप्लेक्टर रायटर म्हणून त्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र ,पदक ,बिल्ला देऊन गौरविण्यात आले आहे . विक्रमाची नोंद करण्यासाठी त्यांना वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य समन्वयक लॉयन भिंगरी, नरेंद्र गौड व डॉ.स्वर्णश्री गुर्राम यांचे मार्गदर्शन लाभले.या त्यांच्या विक्रमा बद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.सुरवातीपासूनच चित्रकलेची आवड असलेले व काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द अंगी असल्याकारणाने त्यांना उलटी अक्षरे लिहिण्याचा छंद लागला. मिरर रायटिंग च्या माध्यमातून त्यांनी विविध वृत्तपत्रात प्रसारित होणाऱ्या जवळपास 2000 कविता उलट्या अक्षरात लिहून काढल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here