- शेतकऱ्यांनी मुंग उडीद व सोयाबीनचे खराब झाडे कृषी मंत्र्यांना दाखविली
- युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
वाशिम (जिल्हा प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – विदर्भासह अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्या पासून सतत पाऊस
सुरू असल्यामुळे शेतकरी मुंग,उडीद पिकांवर कीटकनाशक फवारणी करू शकले नाही त्यामुळे मुंग व उडीद पूर्णपणे वाया गेले असून सोयाबीन सुद्धा मातीत जाण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरसकट पीक विमा व हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांना साकडे घालून मुंग,उडीद व सोयाबीन ची खराब झालेली झाडे दाखवून निवेदन सादर केले
विदर्भात सततच्या पावसामुळे मुंग,उडीद व सोयाबिन पिकांवर फवारणी करू शकले नसल्यामुळे संपुर्ण पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले असून मातीमोल पिके झाली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असून आधीच कोरोनाने कंबरर्डे मोडले असतांना कर्ज काढून शेतकऱ्यांनि पेरणी केली परंतु पावसाने संपूर्ण पिके मातीत घातले आहे. सदरहू शेतकऱ्यांना १००%पीक विमा
लागू करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी या मागणीसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी विदर्भाचे दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांना नांदगाव खंडेश्वर येथे थांबवून शेतातील मुंग,उडीद व सोयाबीनची नुकसान झालेली झाडे दाखवून निवेदन सादर केले यावेळी शिवसेनेचे सुरेश राजगुरे, सरपंच गोकुळ राठोड, श्रीकृष्ण सोळंके, मधुकर कोठाळे, सुनील गुरमुळे, मनोज बणारसे, भुमेश्वर गोरे, प्रशांत काळे, संतोष पुंड,श्याम चौधरी,गणेश आमडारे, आशिष हटवार, अभय बणारसे,रोशन भातूलकर,शुभम रावेकर, सुरज सोळंके, सुरज लोमटे, पवन मोकडेकर,निलेश मारोटकर, राहुल मुके,शुभम बावणे, भावेश भांबुरकर, अक्षय तूपट,शुभम ढाकुलकर,दिनेश मेहेंगे, सागर येवतीकर, सचिन गुल्हाने, अमन मानकर, प्रदून्य सोळंके,विशाल बसवनाथे, गौरव झिमटे, पवन तांनकर,सुरज अंभोरे, रोशन गुल्हाने, सुरज गडलिंग, शंकर मुके,चिंटू मदने, यश मारोटकर, अक्षय हिवराळे, महेश वानखडे,पियुष रावेकर,इत्यादी उपस्थित होते








