मुंबई (आर.टी. आय एक्टिव्हिस्ट प्रदीप भालेकर) – महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेण्ट ऑथॉरिटी” ने “माजी मुख्यमंत्री /महसूलमंत्री -नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या” जुहू च्या समुद्राजवळील अनधिकृत “अधिश बंगल्या” प्रकरणी “मुंबई उपनगर जिल्हाधिकारी” आणि “महानगरपालिका आयुक्त” यांना त्वरित कारवाई करण्याकरिता नोटीस बजावली.
महाराष्ट्रामधील “माजी मुख्यमंत्री /महसूलमंत्री -नारायण राणे” यांनी महसूलमंत्री असताना जुहू मुंबई येथील समुद्रावर समुद्रसपाटीपासून भरती रेषापासून 50 मीटरच्या आत “CRZ-2” या कायद्याचे उल्लंघन करून बनावट रजिस्ट्रेशन पेपर बनवून नोटरीवर रजिस्ट्रेशन केलेल्या पेपरवर स्टॅम्पड्युटी बनवून घेतली..तसेच महाराष्ट्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल एफ.एस.आय. मध्ये बुडवला..तसेच पहिल्यांदा मुलाच्या “नीलेश राणेंच्या” नावाने पेपर “फिरोज” नावाच्या व्यक्तीकडून फक्त स्टॅम्पपेपर नोटरीच्या पेपरवर विकत घेतल्याचे दाखवले..त्यानंतर “नीलेश नारायण राणे” ने स्वतःच्या आईच्या “नीलम नारायण राणेंच्या” नावाने रजिस्ट्रेशन अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच देऊन स्टॅम्पड्युटी करून घेतली…हे सर्व भ्रस्टाचार उघडकीस आणणे गरजेचे आहे..आणि 7 माळयाचे “अधिश नावाच्या” बंगल्याचे अनधिकृत बांधकाम उभे केलेय..तसेच बंगल्याचे बांधकाम करताना जास्त एफ.एस.आय.चा वापर करून करोडो रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा महसूलसुद्धा बुडवला आहे…ह्याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे चिवला बीचवर सी.आर.झेड.चे उल्लंघन करून “नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या” मालकीचा “नीलरत्न” नावाचा अनधिकृत बंगला समुद्राजवळ बांधला आहे..त्यामुळे ह्या दोन्ही अनधिकृत बंगल्यांवर तोडक कारवाई करण्यात आली पाहिज़े.
“माजी मुख्यमंत्री-नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या” “बेहिशोबी संपत्तीची चौकशी” “enforcement directorate” मार्फत करण्यात आली पाहिज़े…”नारायण राणे, आमदार -नितेश राणे, निलेश राणे, नीलम नारायण राणे आणि नारायण राणेंच्या सुना’ यांच्या नावे असलेल्या संपूर्ण बेहिशोबी संपत्तीची चौकशी “ई. डी.” किंवा इतर सक्षम यंत्रणामार्फत होने गरजेचे आहे.
तसेच आता “महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेण्ट ऑथॉरिटी” ने “माजी मुख्यमंत्री /महसूलमंत्री -नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या” जुहू च्या समुद्राजवळील अनधिकृत “अधिश बंगल्या” प्रकरणी “मुंबई उपनगर जिल्हाधिकारी” आणि “महानगरपालिका आयुक्त” यांना दुसरी नोटीस बजावली आहे..ह्या नोटीस अगोदर 2 नोटीस पाठवलेल्या आहेत,, पण “अंधेरी तहसीलदार -सचिन भालेराव”,, आणि “मुंबई उपनगर जिल्हाधिकारी” यांनी बंगल्याचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केली आणि लाखो रुपयांचे पाकिटे घेऊन गप्प बसले, आणि पंचनामा केला नाही..पण आता पुन्हा “महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट प्राधिकरणाने” त्वरित चौकशी अहवाल तयार करवून त्वरित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश “मुंबई उपनगर जिल्हाधिकारी” आणि “महानगरपालिका आयुक्त” यांना दिले आहेत…आता “माजी मुख्यमंत्री-नारायण राणे” यांच्या व कुटुंबियांच्या नावे असलेल्या ह्या “जुहू” येथील बंगल्यावर कधीपर्यंत तोडक कारवाई होणार हीच महाराष्ट्रातील जनता वाट पाहत आहे.








