धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – ज्ञानवंतांची आणि यशवंतांची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूलची माजी गुणवंत तथा आदर्श विद्यार्थिनी डॉ. साक्षी उमाकांत बोरसे ही सध्या नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात कोरोना कोविड सेंटरला कोरोना योद्धा म्हणून आपली सेवा देत आहे. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने तिने स्वतः कोरोना रूग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार महिन्यांपासून ती ही सेवा देत आहे.
डॉ. साक्षी ही पी.आर.हायस्कूलचे ज्येष्ठ गणित शिक्षक उमाकांत सुरेश बोरसे (एम.एससी.मॅथमॅटिक्स,बी.एड्)यांची कन्या व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष तथा ख्यातनाम विधिज्ज्ञ दिलीप बोरसे आणि पी. आर. हायस्कूलचे ज्येष्ठ लिपिक तथा एरंडोल माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक जितेंद्र बोरसे यांची पुतणी आहे. अस्सल कोरोना योद्धा डॉ. साक्षीला मानाचा सलाम..!!







