असोदा येथे श्री अष्टांग योग संस्थेतर्फे वृक्षारोपण

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – तालुक्यातील असोदा येथील अमर फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि साईबाबा मंदिर परिसरात श्री अष्टांग योग बहुउद्देशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.अविनाश कुमावत यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सदस्य तथा निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य सदस्य प्रभाकर कुमावत यांनी मंदिराच्या गाभाऱ्याकरिता देणगी जाहीर केली. त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य व निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.नाना पाटील यांनी त्यांच्या आई स्व.वैजयंताबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ट्री गार्ड व रोप वाटप केले.
यावेळी अमर संस्थेचे सुनिल पाटील, मंगेश पाटील, भरत पाटील, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे विजय जुल्ले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.भरत पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here