धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – जळगाव जिल्ह्यात 16 तालुके असून अनेक दिवसांपासून जळगाव नगर रचना कार्यालयात कायम स्वरूपी नगर रचनाकार हे पद खाली असून त्या ठिकाणी नंदुरबार येथील श्री वऱ्हाडे यांच्याकडे तात्काळ कार्य भार दिलेला आहे. त्यामुळे ते आठवड्यातून एक दिवस फक्त जळगाव येथे येतात व इतर दिवशी ते नंदुरबार येथे कार्यभार पाहतात
तरी जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका वा शासकीय कार्यालय असतील, नागरिकांचे लेआउट, बिल्डिंग परवानग्या असतील अश्या महत्त्वाच्या कामासाठी कायमस्वरुपी अधिकारी असणे आवश्यक आहे तरी जळगाव जिल्ह्यासाठी तात्काळ कायमस्वरुपी नगररचनाकार नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्रा. पी.एम.पाटील यांनी केली आहे. या संदर्भात नगर विकास मंत्री ना.एकनाथराव शिंदे व पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव जळगाव जिल्ह्यासाठी कायम स्वरूपी नगर रचनाकार नियुक्त करण्याची शिवसेनेची मागणी







