जळगाव – जिल्ह्यात स्वॅब तपासणी केलेल्या कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून, आज जिल्ह्यातील १३५ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
यात जिल्ह्यातील जळगाव शहर २१, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ११, अमळनेर १६, चोपडा २३, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव ८, यावल ६, एरंडोल ८, जामनेर १२, रावेर ८, पारोळा १३ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २०२० इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.






