लंडन – चिनी वस्तूंच्या होळीचा स्वस्तातला, भंपक आणि हमखास माध्यमात प्रसिद्धी मिळवून देणारा प्रकार आता सर्वत्र सुरू झाला आहे… हे सारे अर्थहीन आणि तथ्यहीन आहे. त्यापेक्षा ‘आरएसएस’ची शाखा असलेल्या ‘स्वदेशी जागरण मंच’ची चिनी कंपन्यांना दिलेली सर्व कंत्राटे रद्द करण्याची मागणी मोदी सरकारने तात्काळ अंमलात आणावी.
मुळात मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय राजनीतिक धोरण अत्यंत उथळ असल्याचे फटके आता देशाला बसू लागले आहेत. सारे जग फिरून, गळ्यात गळे घालून, बिर्याणी खाऊन आणि बर्थ डे केक भरवून काहीही हाती लागत नाही. मास्टरस्ट्रोक फक्त दुबळ्या पाकिस्तानविरुद्धच का? चीनविरोधात 24 तास उलटूनही दाढ उठू नये? किती स्वमग्न राहणार? किती आत्मस्तुतीचे ढोल बजावणार? आता तरी फुकाची बडबड आणि दिखावू उथळपणातून मोदी, सरकारने बाहेर यायला हवे.
खरे तर, ग्लोबलाझेशनच्या या युगात बायकॉट किंवा “आत्मनिर्भर” सारखे भावनिक फंडे आणि फेंकूगिरी आहे…चीनवर बहिष्कार टाकून काय होणार आहे? ते आपल्याला फक्त 2% निर्यात करतात… आपली विविध उद्योगांची, कच्चा माल व इतर अशी 59% डीपेंडन्सी आहे चीनवर… त्यांनी आपल्याला निर्यात करण्यावर बंदी घातली तर आपला देश कोलमडून पडेल, त्यांना 2% गमावून काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम हा बायकॉट, बहिष्कारवाला तमाशा बंद करायला हवा. मोदी सरकारचे राजनीतिक अपयश समोर येऊ नये म्हणून हे असले फालतू उपक्रम आणि कार्यक्रम आखले जातात. त्यानंतर सर्वत्र निर्बुद्ध पणे ही हमखास प्रसिद्धी मिळवून देणारी “टास्क” करण्यासाठी प्रसिद्धीलोलुप संघटना आणि गल्ली पुढाऱ्यांची चढाओढ सुरू होते. फुकाची बडबड व्यर्थ आहे. आधी सक्षम व्हायला हवे आपण, नंतर बाता कराव्यात, गमजा माराव्यात… नाहक बडबड करून सेन्सेशन निर्माण करणे, देशादेशांशी व्यापारिक वा परस्पसंबंध बिघडवण्याला काहीच अर्थ नाही. 70 वर्षात जपान अमेरिकेकडून शून्य आयात करतो, या भक्त फॅक्टरीच्या फेक प्रचारातही काही तथ्य नाही.






