कल्याण (विशेष प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे पारोळा रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. विजय पाटील यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शिरसमणी येथे १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी विजय पाटील, पोलीस पाटील लोटन बाविस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पाटील (सैनिक), विद्यालयाचे सचिव बाबूलाल पाटील, विकास सोसायटी माजी चेअरमन मनोहर पाटील, किशोर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.








