विजूनाना पाटील यांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान

कल्याण (विशेष प्रतिनिधी) – येथील सामाजिक कार्याची आवड असणारे विजू नाना पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक समाजपयोगी कार्य करण्यात आले. यात गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझर मोफत वाटप, खान्देश मराठा पाटील मंडळाच्या कार्यकारिणीच्या आर्थिक सहकार्याने अन्नधान्याचे वाटप केले. या त्यांच्या कार्याने तालुक्यातील सर्व स्तरातून विजूनानांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व जीवन आधार फाऊंडेशन या संघटनेने विजू नाना पाटील यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र देवून सन्मानीत केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here