निसर्ग-मित्र समितीतर्फे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समितीतर्फे कोरोना या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करतां गरीबांना मदत व कोरोना मुक्त साठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल अमळनेर चे लोकप्रिय आमदार दादासाहेब अनिलजी भाईदास पाटील
यांचा कोरोना योद्धा*म्हणून सन्मान -पत्र,शॉल,व रोप देऊन निसर्गमित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला,यावेळी अमळनेर तालुकाध्यक्ष भूषण पवार सर,शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे सर,अमळनेर तालुका सचिव निलेश सर महाले सर आदी पदाधिकारी उपस्थित होते,
या प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की, अमळनेर शहर व तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली असून लवकरच अमळनेर कोरोनामुक्त होईल असे मनोगत व्यक्त केले,तसेच जनतेने काळजी घ्यावी महत्वाचे काम असेल तरच बाहेर निघावे,प्रत्येकानी माक्स घालावे ,वारंवार साबनाने किंवा सँनी टायझरने स्वच्छ हात धुवावेत असे आवाहन केले, अशी माहिती निसर्ग-मित्र -समिती-चे अमळनेर तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी पत्रकान्वये दिली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here