जळगाव जिल्ह्यात ५१५ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात

जळगाव शहरासह चोपडा, रावेर, पारोळा आणि अमळनेरात वाढला संसर्ग

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ५१५ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.३०) प्राप्त झाल्यानंतर ६९६ कोरोनाबाधित आढळून आले आहे. आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात १६९ आढळून आले असून, चोपडा, रावेर, पारोळा आणि अमळनेरात पुन्हा संसर्ग वाढला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार जिल्ह्यात ६९६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१६९, जळगाव ग्रामीण-५९, भुसावळ-२६, अमळनेर-१४२, चोपडा-७८, पाचोरा-१२, भडगाव-१२, धरणगाव-२३, यावल-११, एरंडोल-५, जामनेर-३४, रावेर-२७, पारोळा-५९, चाळीसगाव-२७, मुक्ताईनगर-८, बोदवड-३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असा समावेश आहे.
आजवर आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे जळगाव शहर-६१२४, जळगाव ग्रामीण-१४९७, भुसावळ-१५२३, अमळनेर-२२४७, चोपडा-२२६४, पाचोरा-१०७३, भडगाव-१२२३, धरणगाव-१२९९, यावल-८८३, एरंडोल-१५२१, जामनेर-१८४६, रावेर-१३३७, पारोळा-१३३५, चाळीसगाव-१६३२, मुक्ताईनगर-८१८, बोदवड-३७३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १४० असे एकुण २७ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्ण असून यातील १९ हजार २१३ रूग्णांनी कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण मृतांचा आकडा ८०६ इतका झालेला आहे. सद्यपरिस्थितीत ७ हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here