साताऱ्यात लवकरच होणार जम्बो हॉस्पिटल

  • हॉस्पिटलला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
  • मंत्री शंभूराज देसाई यांनी केला पाठपुरावा
  • सातारा, कराडमध्ये कोरोनाचा कहर; रात्री उशिरा अहवालात 489 बाधित
  • कोरोना बळींची संख्या चारशेनजिक; रविवारी 99 जणांची कोरोनावर मात
  • इतर व्याधीग्रस्तांवर उपचार रखडले
  • हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्हय़ात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या विस्फोटक ठरु लागली आहे. मात्र यातील लक्षणे असलेल्यांची संख्या असून सौम्य व लक्षणे नसलेल्यांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र वाढत्या संख्येने आरोग्य विभागावरील ताण प्रचंड वाढत चालला असून जिल्हय़ात कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना बेडस मिळणे मुश्किल होवू लागले आहे. एक गोंधळाचे वातावरण निर्माण होवू पहात असून प्रशासनाने कोरोना रुग्ण आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांबाबत तातडीने योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. एकीकडे कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण तर दुसरीकडे इतर रक्तदाब, मधुमेह असा विकार असलेल्यांना उपचार मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच स्थितीत सायंकाळी दिलासा देणारी बातमी गृहराज्यमंत्री शंभूराज देेेेसाई साताऱ्यात लवकरच जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येणार असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शनिवारी रात्री 620 एवढय़ा मोठय़ा संख्येने बाधित आढळून आल्याने जिल्हय़ात भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 489 एवढय़ा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर दिवसभरात 99 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
साताऱ्याला जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी केली रविवारी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व राज्याचे मुख्य सचिवांशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला तात्काळ मान्यता देत साताऱ्याला जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्याचे केले आदेश दिले आहेत. त्यामुळे साताऱ्यात लवकरच २०० ऑक्सीजन बेड व ५० व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी सातारा बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयाच्या परिसरात हॉस्पिटल उभारणीच्या कामास तातडीने सुरुवात करून पंधरा दिवसात हॉस्पिटल उभे करावे, अशा सूचना मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 12, कराड तालुक्यातील 7, खंडाळा तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 2, कोरेगांव तालुक्यातील 3, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 5, पाटण तालुक्यातील 2, सातारा तालुक्यातील 20, वाई तालुक्यातील 19 असे एकूण 99 नागरिकांचा समावेश आहे.
वाढता मृत्यूदर रोखण्याचे आव्हान
एकूण कोरोना बळींची संख्या 382 असून ती चारशेकडे जावू लागल्याने हा वाढता मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. मात्र यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असून वृध्दापकाळ व इतर व्याधींने ते ग्रस्त असतात. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची नोंद देखील कोरोना बळीत होत असल्याबाबत नागरिकांमध्ये सांशकता व्यक्त होत आहे. काही वेळा अहवाल येण्यास वेळ लागला तर नातेवाईकांची प्रचंड ससेहोलपट होत असून या एकूणच गोंधळू पाहणारी स्थिती सावरण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
नागरिक उपचार टाळू लागलेत
सध्या कोरोनाचा कहर सुरु असताना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर शासनाकडून कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यानंतर उपचार असा प्रकार सुरु आहे. मात्र यामध्ये पहिल्यापासून रक्तदाब, मधुमेह वा इतर व्याधींवर उपचार घेणाऱयांची अडचण झाली आहे. उपचारासाठी जावे तर टेस्टला सामोरे जावे लागण्याची भीती लोकांच्या मनात आहे. त्यामुळे उपचार टाळण्याकडे वाढलेला कलही गंभीर आहे. ज्यांना काहीच लक्षणे नाहीत पण इतर व्याधी असतील तर त्यांची कोरोना टेस्ट कशासाठी असा नागरिकांचा सवाल आहे.
अशी आहे जिल्हय़ातील कोरोना स्थिती
जिल्हय़ात आतापर्यंत 44 हजार 165 जणांची कोरोना टेस्ट झाली आहे. त्यापैकी 13 हजार 997 जणांचा अहवाल बाधित आला होता. यामध्ये सध्या उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 6 हजार 407 असून 7 हजार 208 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांपैकी अनेक लक्षणांनुसार तालुकानिहाय कोरोना केअर सेंटरमध्ये असून प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱयांची संख्या दीड हजाराच्या आसपास आहे. तर 2 हजारच्या आसपास लक्षणे नसलेले पण बाधित अहवाल आलेले नागरिक होम आयसोलेट आहेत.
पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनाचा फटका पोलीस दलालाही बसू लागला आहे. काही दिवसांपूर्वी बाधित म्हणून आलेले पोलीस हवालदार संतोष मारुती दळवी हे पोलीस मोटार परिवहन विभागात मेकॅनिक पदावर होते कार्यरत होते. मात्र त्यांनाही दुर्देवाने उपचार सुरु असताना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंत पोलीस दलातील तीन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई, रहिमतपूर व साताऱयातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱयाचा समावेश असून आहे. पोलीस दलातील कोरोना योध्दांना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे.
शनिवारी रात्री अहवालात 620 बाधित
कराड तालुका 167 बाधित : सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 8, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 13, रविवार पेठ 4, उंब्रज 2, श्री हॉस्पिटल 2, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, आगाशिवनगर 5, कोयना वसाहत 1, मार्केटयार्ड 2, कार्वेनाका 3, स्वामी विवेकानंद नगर 1, कराड 11, शिवाजी सोसा. 2, वाठार कॉलनी 1, रेवणी कॉलनी 3, कोरीवले 1, पाल 1, मलकापूर 14, शिवाजीनगर 1, घारेवाडी 1, गोटे 1, राजमाची 1, शेणोली 1, सैदापूर 4, वारुंजी फाटा 1, रेठरे बु. 7, तांबवे 4, येळगाव 2, यशवंतनगर 3, खोडशी 2, वाडोल 1, पार्ले 3, कोपर्डे हवेली 1, केसे 1, नावडी 1, अणे 1, कोडोली 1, कार्वे 1, कोपर्डे हवेली 4, बनवडी 1, हजारमाची 1, वारुंजी 3, विंग 2, आबाईची वाडी 1, शहापुर 1, बेलवडी 1, ओगलेवाडी 1, काले 3, येणपे 1, नांदगांव 1, सावडे 1, कोनेगांव 4, खराडे 1, उंडाळे 5, बेलवडे बु. 3, कोळे 1, उत्तर कोपर्डे 1, शेरे 2.
सातारा तालुका 137 बाधित : करंजे 4, समर्थनगर 3, आसनगाव 1, संगमनगर 4, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 4, शुक्रवार पेठ 3, शनिवार पेठ 5, रविवार पेठ 2, सदरबझार 5, यादोगोपाळ पेठ 3, देगांव 2, कुमठे 1, संभाजीनगर 3, धनगरवाडी 1, पळशी 6, शाहूनगर 1, अपशिंगे 1, भरतगाव 4, फडतरवाडी 2, मल्हारपेठ 3, चिमणपुरा पेठ 3, पाडळी 1, पिरवाडी 11, माचीपेठ 1, शाहुपुरी 7, गोडोली 1, उरमोडी 2, संगम माहुली 1, कृष्णानगर 3, प्रतापगंज पेठ 3, पेट्री 1, खेड 1, गोकर्णनगर 1, सोनावडी 3, मर्ढे 1, विकासनगर 4, खिंडवाडी 4, पाटखळ 1, भारतमारली 2, अंबेदरे 1, सैदापूर 1, व्यंकटपुरा 1, गोडोली 3, लावंघर 1, सदाशिव पेठ 2, सातारा 11.
माण तालुका 54 बाधित : माण 1, म्हसवड 13, गोंदवले बु. 4, दहिवडी 4, कुकुडवाड 1, आंधळी 1, राणंद 6, इंजवाब 12, बीजवाडी 1, मोरगांव 1, पळशी 5, कारखेळ 1, दिवड 1, बिदल 1, लाडेवाडी 1, वडूज 1. इतर 22 बाहेरील जिह्यातील – सांगली 32, कोठळी 1, पुरंधर 1.
खटाव तालुका 47 बाधित : अंबवडे 3, मायणी 11, बोबडे गल्ली 1, वडुज 9, ललगुण 1, पुसेसावळी 6, मायणी 6, अंबवडे 1, डांभेवाडी 2, येराळवाडी 1, पुसेगांव 2, बुध 1, निढळ 1, निमसोड 1, कानकात्रे 1, शेटफळ 1.
वाई तालुका 41 बाधित : पाचवड 2, रविवार पेठ 3, रामडोह आळी 2, आमरळ 1, गुलमोहर कॉलनी 1, शेलारवाडी 4, एमआयडीसी 6, उडतरे 2, धर्मपुरी 1, गंगापूरी 1, गणपती आळी 4, दह्याट 1, बोपेगांव 3, बावधन 4, गरवारे गेस्ट हाऊस 1, भुईंज 2, चिंधवली 1, वाई 1, मधली आळी 1.
कोरेगाव तालुका 29 बाधित : कोरेगांव 6, कटापूर 4, बर्गेवाडी 5, कुमठे 4, जुनी पेठ 3, वाठार स्टे. 1, रहिमतपूर 1, पिंपोडे 1, अंभेरी 1, भक्तवडी 1, एकसळ 1, साप 1, चौधरवाडी 1.
खंडाळा तालुका 24 बाधित : अश्विनी हॉस्पिटल लोणंद 2, शिवाजीनगर 5, चौपाला 2, जांभळीचामळा 3, शिरवळ 4, वडगाव 1, लोणंद 6, राजेवाडी 1.
फलटण तालुका 25 बाधित : फलटण 3, नाईक बोंबवाडी 3, विडणी 2, धुळदेव 1, बरड 9, जाधववाडी 1, सोमनथळी 3, पाडेगांव 1, आदर्की खु. 1, होळ 1. पाटण तालुका 18 बाधित : पापर्डे 1, पाटण 3, दौलतनगर 2, ढेबेवाडी 5, बहुले 1, गोकुळ तरडे 1, पडळोशी 1, धायती 1, कुंभारगांव 1, बनपुरी 1, विहे 1. महाबळेश्वर तालुका 9 बाधित : खाजाभाई सोसा. 4, गोडवली 4, पाचगणी 1. जावली तालुका 6 बाधित : दरे खु. 1, भिवडी 3, कुसुंबी 1, हुमगाव 1.
255 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 35, खंडाळा 50, रायगांव 44, मायणी 70, महाबळेश्वर 40, असे एकूण 255 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 44378 , एकूण बाधित 13997 , घरी सोडण्यात आलेले 7208, मृत्यू 382, उपचारार्थ रुग्ण 6407
रविवारी जिल्हय़ात एकूण बाधित 489, एकूण मुक्त 99, एकूण बळी 11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here