महाड (विशेष प्रतिनिधी) – ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था झाल्यानंतर मद्यपी व्यक्ती कोणत्याही थराला
जाऊ शकतो याचा अनुभव महाडवासियांना आला.
महाङ शहरातील पोलिस ठाण्याशेजारच्या बिल्डींगच्या टेरेस वर एक माथेफिरु दारू पिऊन चढला. तिथे बसून त्याने त्या टेरेसच्या पत्र्यांची तोडफोडदेखील सुरु केली. अवघ्या काही वेळातच तिथे बघ्यांची गर्दी जमली. अनेकांनी त्याला खाली उतरण्यासाठी समजावून सांगितले. पण तो काही ऐकेच ना. अखेरीस महाड पोलिसांनी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला व इस्केप टीमला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पत्र्यावर चढण्यास सुरुवात करताच या मद्यपीने त्यांच्यावरदेखील हल्ला केला. मात्र अथक प्रयत्नांनंतर या मद्यपीला त्यांनी ताब्यात घेतले व पुढील अनर्थ टळला. या मद्यपीला ताब्यात घेण्यासाठी परिश्रम घेणारे नगरपालिकेतील गणेश पाटील व त्यांचे सहकारी यांचे रायगडभूषण ज्येष्ठ पत्रकार तसेच आपत्ती सुरक्षा तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी कौतुक केले आहे.








