वसुंधरा मातेच्या निकोप प्रकृतीसाठी वृक्षसंवर्धन लोकचळवळ व्हावी – सावित्री सोळुंके

जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके यांचे वृक्षदान प्रसंगी प्रतिपादन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – वसुंधरा मातेच्या मी निकोप प्रकृतीसाठी वृक्षसंवर्धन लोकचळवळ होणे काळाची गरज आहे ” असे प्रतिपादन जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके यांनी केले . खोटे नगर येथील समाजसेवा उपक्रमशील पुरस्कार प्राप्त मोरया गणेश मंडळाला वृक्ष दान प्रसंगी दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सोळुंके बोलत होत्या .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध आर्टिस्ट रवींद्र सोळुंके उपाख्य रवी आर्ट असून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे , क्रिडा शिक्षक राजेश जाधव उपस्थित होते .प्रारंभी श्री गणेशाचे पूजन व पंचारती रविंद्र सोळुंके व सावित्री सोळुंके दांपत्याने केली .
संचालिका सावित्री सोळुंके , रवी आर्ट , विजय लुल्हे यांच्या हस्ते चिंच , सीताफळ ,आवळा , निंब या देशी प्रजातींच्या रोपांचे वृक्ष दान मोरया गणेश मंडळाला करण्यात आले . तत्पूर्वी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले यांचे पिताश्री स्वर्गीय किसन पुना नाले यांचे कार्यकर्तृत्व विजय लुल्हे यांनी सांगितले .त्यानंतर स्वर्गीय किसन नाले यांना मोरया गणेश मंडळ व प्रदूषण निवारण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . विजय लुल्हे यांनी वृक्षसंवर्धन प्रतिज्ञा उपस्थित कार्यकर्त्यांना दिली . सदरहू रोपे लुल्हे यांनी वृक्षारोपणासाठी उपलब्ध करुन दिली .
वृक्ष संगोपनाचे पालकत्व वृक्षप्रेमी मंडळाचे उपाध्यक्ष हितेश पाटील , सहसचिव हर्षल चौधरी , गणेश कुमावत , सदस्य मिलिंद वाघ , दिनेश पाटील, चेतन हटकर यांनी घेतली . मंडळाचे सचिव सिद्धांत कदम व सल्लागार विलास कुमावत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . प्रस्तावनेत मंडळाचे अध्यक्ष उमाकांत जाधव यांनी मंडळाने राबविलेल्या राष्ट्रीय , सामाजिक , शैक्षणिक , आरोग्य , पर्यावरण , महिला तसेच दिव्यांग ,वृद्ध व निराधार दीन दलितांसाठी तसेच कोविड महामारीत दररोज सहाशे मजुरांना दिलेल्या अन्नदान अशा विविध कृती कार्यक्रमांची संक्षेपाने ओळख दिली .
अध्यक्षीय भाषणात रवि आर्ट म्हणाले की , ” जैव विविधतेचा ऱ्हास नैसर्गिक प्रकोप नसून विकृत मानवी प्रवृत्ती निर्मित संकट आहे . मुलांना भौतिक संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा निकोप जैवविविधतेचा अक्षय आरोग्य संपन्नतेचा वारसा अग्रक्रमाने देणं कालोचित गरज आहे . ”
कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील गणेशभक्त बहुसंख्येने उपस्थित होते .सुत्रसंचालन उपाध्यक्ष अजय खरात व आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष मंथन ईशी यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here