जालना (घनसावंगी विशेष प्रतिनिधी) – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली घनसावंगी भारतीय जनता पार्टीचे दार उघड सरकार दार उघड,मंदिर,मज्जित,चर्च, गुरुद्वार इत्यादी धार्मिक स्थळांचे दार उघड उद्धवा,दार उघड. दारू नको भक्तीचे दार उघड…. अशा घोषणा देत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने घनसावंगी येथे तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे खुले करण्यासाठी केंद्र शासनाने आदेश दिले असतानाही महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे कोरोना मुळे गेली सहा महिन्यापासून मंदिर बंद आहेत मंदिर बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांचे जीवन या मंदिरावर चालतात गेली सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या लाखो लोकांचा जीवन उद्धाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात दारूचे दुकान उघडते तर मंदिर
उघडायला काय हरकती शासनाने दिलेल्या नियमात मंदिर तात्काळ उघडावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टी व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने घनसावंगी येथे तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले यावेळी नायब तहसीलदार उन्हाळे व मंडळ अधिकारी घनवट यांना निवेदन देताना ह.भ.प.रमेश महाराज वाघ,भाजपा अ.जा. प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलासराव शेळके,गोविंद ढेंबरे,तुकाराम महाराज राठोड,भास्कर महाराज हरबक,अंबादास महाराज शेळके,योगेश ढोणे,सुरेश पोटे,सुरेश उगले,अर्जुन माळोदे,एकनाथ राठोड,सिद्धेश्वर भाणूसे,किशोर गिराम,राहुल काळे,बप्पा देवडे,अर्जुन थेटे,जगन्नाथ मुळे,रमेश काळे,बाळासाहेब बहिर,विलास चव्हाण,मधु गुढेकर,विश्वास घुले,शिवाजी राठोड,कांतराव वराडे,राम भालेकर,राजु वाघमारे,रघुनाथ इंचाळ,संदीप काळे,अनिल तौर,सुनील शेंडगे,गजानन काकडे,ज्ञानेश्वर सानप,सुनील गुढेकर,हरिदास पवार,हरिभाऊ तांगडे,भगवान काकडे,सुहास साबळे व उपस्थित मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.







