सावधान !gst च्या नावावर puc वाल्यांची फसवणूक सुरु झाली

(यशवंत चव्हाण सीबीडी बेलापूर.)
परिवहन विभागाने १ सप्टेंबर पासून दंडाची विविध श्रेणी जाहीर केली त्यात puc केले नसेल तर १००० रु. दंड आकारणी करण्यात येईल असे परिपत्रक काढले.मी आज माझ्या दुचाकीचे सीबीडी रेल्वे स्टेशन जवळ असलेले पेट्रोल पंपावरील puc सेन्टर वर pucकाढले त्यात मला तफावत दिसून आली ती अशी puc चे ३५ रु.व gst चे १५ रु. असे माझ्याकडून ५० रु.घेण्यात आले.रिसीट चेक करता त्यात १५ रु. gst चा कुठेही उल्लेख नाही चौकशी करता असे सांगण्यात आले कि १५% टक्के gst बसतो.पण ३५ रु.वर १५% प्रमाणे ५.२५ पैसे gst बसते (३५+५,२५ =४०.२५ )९.७५ पैसे जास्त घेतले. मग ते ५० रु.का घेता अशी विचारणा केली असता आणि gst १५% टक्के याचा उल्लेख रिसीट मध्ये का नाही याच उत्तर असे दिले कि,दर महिन्याला टोटल कलेक्शन वर १५% gst आरटीओ मध्ये पाठवली जाते.प्रश्न असा निर्माण होतो कि,gst चा उल्लेख puc रिसिटवर का नाही.? ह्यात काही काळेबेरे आहे का ? वाहक चालकांकडून हे अतिरिक्त पैसे घेऊन ग्राहकांची फसवणूक नाही का ? ह्या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन ग्राहक लूट थांबणार का ? puc वर १५% gst योग्य आहे का आणि आवश्यक आहे का ?puc ग्राहकांनी सावधानता बाळगणे व स्वतःची आर्थिक लूट करू न देणे व तक्रार करणे गरजेचे तरच अश्या गोष्टींना पायबंद बसेल अन्यथा आहेच गरिबीमे आटा गिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here