मुंबईचा महाराजाधिराज उभा आहे, पेन्सिलच्या टोकावर; सर्वात लहान ९ मिलिमीटर उंचीची गणेश मूर्ती

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – घाटकोपर येथील ओम श्री. सिद्धिविनायक मित्र मंडळ, (साकिनाका) परेरावाडी. या मंडळाने यंदा मुंबईतील सर्वात लहान ९ मिलिमीटर उंचीची गणेश मूर्ती पेन्सिलच्या टोकावर साकारली आहे. या मंडळाची स्थापना १९९३ साली झाली असून मुंबईचा महाराजाधिराज म्हणून अशी या बाप्पाची ओळख आहे. दरवर्षी हे मंडळ पर्यावरणपूरक कागदी मूर्तीची स्थापना करते. यावर्षी ही ३ फूट कागदी पूजेची मूर्ती बसवण्यात आली होती.
कोरोनाच्या या काळात मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश (बंटी) खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली सॅनिटायझर स्प्रे, अर्सनीक अल्बम ३० वाटप, रक्तदान शिबीर, कोरोना बद्दल जनजागृती अभियान, मास्क वाटप, गायींना चारा वाटप, विभागातील स्थानिक डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप आणि व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन असे नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम या मंडळाने घेतले आहेत. तसेच विशेष म्हणजे भक्तांना या मंडळाने प्रसादात व्हिटॅमिन – सी (C) गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन मंडळासमोर कृत्रिम तलावात करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here