नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत गणेशोत्सवात गणेशमंडळांकडून व्यसनमुक्तीचा संदेश

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर १५ ऑगस्ट २०२० पासून नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. देशातील २७२ जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर दोन्ही जिल्ह्यात हे अभियान राबविण्यास सुरवात झाली आहे. मुंबई शहरात यासंबंधीत विविध ठिकाणी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना व्यसनमुक्त राहण्याचा संदेश दिला जात आहे.
याचाच एक भाग म्हणून ऑगस्ट महिन्यातील गणेशोस्तवाच्या गणेशमंडळांकडून यावर्षीचे कोरोना काळातील गणेशोस्तवाचे सर्व नियम पाळत विविध उपक्रम घेऊन गणेशोस्तव साजरा केला. त्यासोबत व्यसनमुक्तीचा उपक्रमही घेण्यात आला. यामध्ये घाटकोपर, मालाड, बोरीवली विभागातील मंडळाने पुढाकार घेतला. या उपक्रमादरम्यान काही मंडळांपैकी विशेष आकर्षण म्हणजे मुंबईचा महाराजाधिराज
ओम श्री. सिद्धिविनायक मित्र मंडळ (साकिनाका) परेरावाडी, घाटकोपर. या मंडळाची स्थापना १९९३ साली झाली. या मंडळात विशेष ९ मिलिमीटरची पेन्सिलवर शिष्याची उत्सव मूर्ती व ३ फूट कागदी पूजेची मूर्ती बसवण्यात आली होती. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश (बंटी) खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना काळात सॅनिटायजर स्प्रे, अर्सनीक अल्बम ३० वाटप, रक्तदान शिबीर, कोरोना बद्दल जनजागृती अभियान, मास्क वाटप, गायींना चारा वाटप, विभागातील स्थानिक डॉक्टरांना पीपीई किट आणि हा व्यसनमुक्ती पोस्टर प्रदर्शन असे नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. तसेच विशेष म्हणजे या मंडळाने प्रसादात व्हिटॅमिन – सी (C) गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. गणेशाची मुर्ती विसर्जन मंडळासमोर कृत्रिम तलावात करण्यात आली.
देशातील सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण त्यामुळे होणारे मृत्यु दर पाहता, तरुणांमधील वाढलेली बेरोजगारी, व्यसनीव्यक्तीकडून कुटुंबातील सदस्यांचा होणारा मानसिक – शारीरिक – आर्थिक
छळ, व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, कोरोना काळात व्यसनांपासून दूर राहून घ्यायची काळजी याबाबत पोस्टर प्रदर्शनी याद्वारे जनजागृतीसाठी मालाड (पूर्व) कुरर विलेज, तानाजी नगर येथील विजयशक्ती गणेश मंडळ आणि बोरीवली (पूर्व), बाभळीनाका येथील सिद्धिविनायक मंडळ यांनी सहकार्य केले. या उत्सवात घेतला गेलेला नशामुक्त भारत अभियान हे जिल्हाधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व मुख्य संघटक अमोल मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. अशी माहिती मुंबई विभागीय संघटक सौ. दिशा कळंबे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here