जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून थेट श्रीगणेश मूर्ती विसर्जन न करण्याचे
नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत नागरिकांकडून श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रात अर्पण करण्यात आल्या.
यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तसेच गणेश मूर्तींचे संकलन करा, अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. जळगाव महानगर पालिकातर्फे श्री गणेश मूर्ती संकलन केंद्रात युवा प्रेरणा फाउंडेशनचे कार्यकर्ते विक्की सोनार , अनिलदादा जोशी, सुहास जोशी, निलेश शिंपी , दीपक जोशी , जितु पवार , हर्षद वाढवणी , संकेत बागुल यांनी संकलन केंद्रात देण्यात आलेल्या श्री गणेशाची विधीवत आरती करून व गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत गणरायाला निरोप दिला. याप्रसंगी श्री. भोसले, श्री. रणध्ये व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/108973650860466/videos/425126111798123/?t=2







