कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 619 बाधित; 24 मृत्यू

कोल्हापूर (नियाज जमादार) – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर 619 नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत बाधित असलेल्या 24 हजार 081 पैकी 15 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 9 हजार 32 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 732 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने आरोग्य विभागाची पार झोप उडाली आहे. गंभीर होऊनच रुग्ण पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे चित्र आहे. गंभीर रुग्णांना श्‍वसनाचा त्रास असेल, तर व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नाही. व्हेंटिलेटरसाठी सध्या रुग्णालयांत वेटिंग सुरू आहे. त्यामुळे कोरोनासद‍ृश लक्षणे जाणवू लागताच वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.
रविवारी रात्री 12 वाजता 20 नवीन बाधित रुग्ण आढळले. यामध्ये पन्हाळा 10, शिरोळ 8, करवीर व राधानगरीतील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. रात्री 12 वाजता पुन्हा तब्बल 63 बाधितांची भर पडली असून, यात हातकणंगले 51, करवीर 4, तर शिरोळमधील 8 जण आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता 19 बाधित आढळले असून, यामध्ये शहर, करवीर तालुक्यात प्रत्येकी 7, तर पन्हाळा, गगनबावडामध्ये प्रत्येकी 1, तर करवीरमध्ये 3 जणांचा समावेश आहे. दुपारी 12.30 वाजता शिरोळ तालुक्यात 50, तर शहरात 12 जण बाधित आढळले आहेत. दुपारी 12.30 वाजता आणखी 45 बाधितांची भर पडली असून, शहरातील 36, करवीर 7, पन्हाळा व शाहूवाडीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. 12.30 वाजता पुन्हा 29 बाधितांची भर पडली. यात करवीर 9, शहरात 10, हातकणंगले व पन्हाळ्यात प्रत्येकी 4, तर शाहूवाडीतील 2 जण आहेत. 12.45 वाजता 25 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्‍त झाला. यात शहर 17, करवीर 5, पन्हाळा 2, तर कागलमधील एकाचा समावेश आहे. दुपारी 3.15 वाजता 26 आणखी बाधित आढळले. यात शहर 8, हातकणंगले 7, जिल्ह्याबाहेरील 4, करवीर व राधानगरीतील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. साडेतीन वाजता आढळलेल्या बाधितांमध्ये शहरातील 13, हातकणंगले 4, करवीर व शाहूवाडीतील प्रत्येकी 2, तर कागल, भुदरगड, राधानगरीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
4.30 वाजता 64 नवीन बाधितांची भर पडली असून, यामध्ये शहरातील 36, हातकणंगले 11, करवीर 8, जिल्ह्याबाहेरील 5, तर शिरोळ व राधानगरीतील प्रत्येकी 2 जण आहेत. सायंकाळी 5 वाजता 26 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, यात भुदरगड 13, हातकणंगले 12, तर गगनबावडा येथील 1 व्यक्‍ती आहे. 5.15 वाजता 16 नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये हातकणंगले 11, शहर 2, तर शाहूवाडी, कागल व करवीरमधील प्रत्येकी एका व्यक्‍तीला संसर्ग झाला आहे. साडेपाच वाजता 25 बाधित आढळले असून, यात शिरोळ 11, करवीर 4, आजरा 5, हातकणंगले 1 व जिल्ह्याबाहेरील 1 रुग्णासह राधानगरी तालुक्यात 3 बाधित आढळले. 5.45 वाजता 21 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्‍न झाले. यात 12 हातकणंगले, 5 चंदगड, 3 गडहिंग्लज, तर शिरोळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे. 6.30 वाजता चंदगडमध्ये 2 बाधित आढळले आहेत. 7 वाजता 29 जणांना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्‍त झाला. यात शिरोळ 27, राधानगरी व शहरात प्रत्येकी एकजण आहे. 7.30 वाजता शहरात पुन्हा 5 बाधितांची भर पडली. रात्री आठ वाजता 23 आणखी बाधित आढळले. यात शहरातील 13, तर शिरोळ तालुक्यातील 10 जण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here