मुक्या प्राण्यांना जागवण्याचा दिला नागरिकाना संदेश !
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पावसाळ्यामधें भटक्या श्र्वानांचा खाण्याचा प्रश्न उदभवत असल्याने नेरुळ मध्ये
एक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रम अंतर्गत जयश्री फाउंडेशन च्या माध्यमातून तरुणांनी परिसरातील दीडशेहून अधिक श्र्वानांना पौष्टिक आहार दिला पेडीग्रीची चिकन ग्रेवि व द्रूल्स चे कोरडे अन्न आणि पार्ले ची बिस्कीट या गोष्टींचा आहारात समावेश होता .
यावेळी स्वतः फाउंडेशन अध्यक्ष वैभव जाधव तसेच अतिश खोत , साहिल कळंत्रे , अजय खिलचे , स्वप्नील म्हात्रे वेळो वेळी उपस्थित होते. इथून पुढे हि ते हा उपक्रम चालू ठेवणार सल्याच त्यांनी म्हंटल नागरिकांना हि ह्या मध्ये सहभागी होण्याची संधी ते देत आहेत.








