- शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक
- नामपुर बाजार समितीचे कांदा निलाव बंदच
नाशिक (विशेष प्रतिनिधी) – आज नामपूर बाजार समितीत व्यापारी वर्गांने 10 रुपये प्रति वाहन काटा करण्याची रक्कम वाढवण्याचा घाट घातला होता. मनमानी पध्द्तीने शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याच्या भूमिकेतून हे निर्णय निघत असतात याची प्रचिती अनेक वर्षांपासून शेतकरी नामपूर बाजार समितीच्या बाबतीत बघत आलेला आहे.
शेतकरी वर्गाला 30 रुपये काटा करण्याचे परवडत नाही तर 10 वाढवून 40 रुपये कसे देणार, पट्टी वर तोलाई काढत असतांनासुद्धा भुई काटा करायला डबल पैसे त्याने का द्यावे. अजिबात देणार नाहीत, असे राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने व कांदा विक्री करायला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले असून, 30 ऐवजी 20 रुपये काटा करण्यात यावा व जर शेतकरी माल विक्रीस आणत असेल तर व्यापारी पण माल खरेदी करतो दोघांची जबाबदारी आहे माल मोजून देणे आणि घेणाऱ्याने माल मोजून घेणे म्हणून दोघांनी 10 – 10 रुपये खर्च करावेत. असे एकत्रितपणे काटावाल्याला 20 रुपये देण्यात येऊन योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची योग्य मागणी आहे.
कोणी मनमानीपणाने लूट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य पद्धतीने पायबंद घालायला कांदा उत्पादक शेतकरी समर्थ आहोत, याचा विचार करण्यात यावा. बाजार समितीत शेतमाल विक्री होणे हा मुख्य उद्देश आहे. त्याची अडवणूक करून नफा कमविणे हा नव्हे, हे ही संबंधितानी लक्षात घावे. लवकरच व्यापाऱ्याला लायसन्स देतांना कोणत्या अटी व शर्ती घालून सरकारच्या नियमांत बसून बाजार समिती लायसेन्स देते याचा अभ्यास करून राज्य सरकार कडून नवीन जीआर काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना करणार आहे, अशी माहिती संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना नाशिक कुबेर जाधव यांनी बुलंद पोलीस टाइम्स्शी बोलताना दिली.
वास्तविक ३० रुपये सुद्वा जास्तच होतात ,आज थोडी फार तेजी आली म्हणून कांदा उत्पादक वजन काठ्यापोटी देणे शक्य आहे ,वास्तविक बाजार समितीनेच २ ,३ अधिक वजन काटे तयार करून १० ते २० रुपये दराची आकारणी करुन कांदा उत्पादकांच्या हीताचा विचार केला पाहिजे, व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने अचानक ४० रुपये काटा वजन वाढवले, ते चुकीचे आहे , व्यापाऱ्यांनी समंजसपणा दाखवून निर्णय मागे घ्यावा. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा व संचालक मंडळाबरोबर चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे हीत साधले जाईल.
– कुबेर जाधव
संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना नाशिक