मोबाईलवरून सेल्फी घेताना नाशिकचे रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचा मृत्यू

नाशिक (संपर्क प्रमुख कुबेर जाधव) – इगतपुरी तालुक्यात आज मंगळवारी (ता. 1) संध्याकाळच्या सुमारास पर्यटनाकरीता आलेले महाराष्ट्राच्या अंडर ट्वेंटी थ्री क्रिकेट संघाचे शारीरिक फिटनेस मार्गदर्शक व प्रसिध्द युवा योगा टीचर शेखर गवळी दरीत हे मोबाइलद्वारे सेल्फी घेत असताना अचानकपणे पाय घसरून 250 फुट खोल दरीत पडले असून शोध कार्य सुरू आहे. अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आले होते. त्यावेळी ते सेल्फी घेत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट २५० फूट दरीत कोसळले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. तसेच इतर स्थानिकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा काहीही शोध लागू शकला नाही.
इगतपुरी पोलिसांसह नाशिकच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी घेतली गंभीर नोंद. आपत्ती व्यवस्थापन टीम इगतपुरीच्या दिशेला रवाना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here