जळगाव जिल्ह्यात आज ५६२ रुग्णांची कोरोनावर मात

आज आढळले ८०१ कोरोनाबाधित; सर्वाधिक १९३ कोरोनाबाधित जळगाव शहरात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज बुधवारी ८०१ कोरोनाबाधितांची भर पडून एकूण रुग्णसंख्या २८ हजार ९३३ एवढी झाली आहे. आज सर्वाधिक १९३ कोरोनाबाधित जळगाव शहरात आढळून आले आहे. दिवसभरात ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ५६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
आज आढळून आलेल्या ८०१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १९३ , जळगाव ग्रामीण ३८, भुसावळ ६९, अमळनेर ५१ , चोपडा ८२, पाचोरा ८, भडगाव ६, धरणगाव २१ , यावल २०, एरंडोल १२८, जामनेर ६२, रावेर २०, पारोळा १७, चाळीसगाव ५४, मुक्ताईनगर २, बोदवड २२, इतर जिल्ह्यातील ८ असा समावेश आहे. मृत झालेल्या ९ कोरोनाबाधितांमध्ये एरंडोल, भुसावळ तालुक्यात प्रत्येकी २ तर अमळनेर, जामनेर, भडगाव, रावेर, चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे
तालुकानिहाय एकुण आकडेवारी बघता जळगाव शहर-६५०६, जळगाव ग्रामीण-१५७०, भुसावळ-१६४४, अमळनेर-२४२४, चोपडा-२४३३, पाचोरा-१०९२, भडगाव-१२८७, धरणगाव-१३५५, यावल-९१२, एरंडोल-१६९९, जामनेर-२२००, रावेर-१३३२, पारोळा-१४०७, चाळीसगाव-१७२०, मुक्ताईनगर-७८७, बोदवड-४०८ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १५७ असे एकुण २८ हजार ९३३ कोरोनाबाधित असून, यातील २० हजार ८३० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७ हजार २७२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here