पंचशील नगर चेंबूर येथील दोन बुद्ध विहारासाठी उपोषणास बसलेल्यांच्या संघर्षाचा आजचा ६१३ वा दिवस!!

  • प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी आंदोलन करणारे या माय माऊली याकडे लक्ष देतील का?
  • सर्वपक्षीय नगरसेवक आमदार खासदार मंत्री राष्ट्रीय नेते यांनी भेट देऊनसुद्धा जैसे थे तैसे

ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) – चेंबूर पंचशील नगर याठिकाणी अशापुरा डेव्हलपर्स व अरिहंत रिअलटर्स यांच्यामार्फत एस आर ए योजना चालू आहे परंतु या ठिकाणी असणारे वैशाली बुद्ध विहार व पंचशिल बुद्ध विहार हे विकासकाने गिळंकृत केले आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात धार्मिक स्थळाचा प्रश्न खूप गाजत आहे कुणी घंटानाद करत आहे कोणी पंढरीची वारी करत आहे पुणे मोर्चा काढणार आहे. मग बुद्ध विहार सुद्धा एक धार्मिक स्थळ आहे व प्रार्थना स्थळ आहे त्याच्यासोबत हा दुजाभाव का? आज 612 दिवस झाले पंचशील नगर अमर महाल चेंबूर मुंबई या ठिकाणी गोरगरीब महिला बुद्ध विहारासाठी व आपल्या हक्काच्या घरासाठी उपोषणाला बसले आहेत
याठिकाणी सत्ताधारी व विरोधी पक्षातील सगळेच मंत्री आमदार खासदार नगरसेवक समाजसेवक राजकारणी यांनी हजेरी लावली व प्रसिद्धी मिळवली परंतु या लोकांना अद्याप न्याय देण्याचे कार्य कुणीही केलेला नाही तत्कालिन गृहनिर्माणमंत्री रवींद्र वायकर, सध्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड. जयंत पाटील, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय महिला नेत्या सीमाताई रामदास आठवले, स्थानिक नगरसेवक सुशम सावंत, गुरुनाथ मिठबावकर ,माजी खासदार एकनाथ गायकवाड, सध्याच्या खासदार पूनम महाजन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे, बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम समाज सेवक निशांत बगेरा पवित्रा श्रीवास्तव घाटला येथील नगरसेवक अनिल भाई पाटणकर व सामाजिक कार्यकर्ते सातार्डेकर महा विकास आघाडीतील मंत्री व आक्रमक नेते बच्चुभाऊ कडू यांच्यासोबत सत्ताधारी व विरोधी पक्षनेते त्यातील सर्वांनीच या ठिकाणी भेट देऊन तुमचा प्रश्न दोनच महिन्यात मिटवू असे आश्वासन दिले पण आज 612 दिवस झाले तरीसुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न जसाच्या तसा आहे यावर कुणी लक्ष देईल का असा आरोप महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय बोराडे यांनी केला त्यांच्यासोबत महासचिव सिद्धार्थ काळे व भास्कर खरात यांनीसुद्धा या गोष्टीत दुजोरा दिला .
या ठिकाणी गरीब जनता आहे गोरगरीब मागासवर्गीय दुष्काळग्रस्त भागातील आहे एवढे मोठे नेते, मंत्री ,आमदार, खासदार याठिकाणी हजेरी लावून सुद्धा यांच्या घराचा व बुद्धविहाराला प्रश्न मार्गी का लागत नाही. असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मंदिर मशीद, गुरुद्वारा ,चर्च विविध धर्माचे प्रार्थना स्थळे जरूर उघडा आमचा त्याला कुठलाही आक्षेप नाही .संविधानाने दिलेला तो अधिकार आहे परंतु संविधानाने गोरगरिबांना घराचा निवाऱ्याचा व बौद्धांना बुद्धविहारात सुद्धा अधिकार दिलेला आहे परंतु या एरियात बौद्धांची घरे आहेत व बौद्धांचे बुद्धविहार आहे म्हणून जाणून बुजून तर हे घोंगडे भिजत ठेवले जात नाही असाही प्रश्न निर्माण होतो ॲडवोकेट संतोष सांजकर व त्यांचे सहकारी सतत या विषयावरती आवाज उठवत आहेत. बऱ्याच वेळा एस आर ए चे ठाकूर साहेब यांच्यासोबत बैठक झाली ,आझाद मैदान वरती मोर्चा काढला ,चेंबूरला निदर्शने झाली सध्या उपोषण चालू आहे. परंतु या बुद्ध विहाराच्या व घराच्या प्रश्नावर कुठलाही निर्णय होत नाही . याठिकाणी काम सुरु असताना विकासकाच्या चुकीमुळे एका 12 वर्षीय मुलीचा डोक्यात सिमेंट ठोकळा पडून मृत्यू झाला होता त्यावरही अजून काही कारवाई झाली नाही.
याठिकाणी उपोषण करणाऱ्या बेबी मकासरे यांचे पती शामराव मकासरे यांचे सुद्धा उपोषण चालू असताना याठिकाणी निधन झाले आणि बरेच लोक मरण्याच्या परिस्थितीत आहेत. याठिकाणी उपोषणास बसलेल्या 90 वर्षे आजी आजही या मंडपांमध्ये उपोषणास बसलेल्या आहेत त्याचबरोबर मालनबाई डोंगरे, पार्वताती बाई शिंदे ,सखुबाई रोटे, कासाबाई ननावरे ,कौशल्‍याबाई जगताप, ज्योती बाबू ,शाहू बाई पारधे, बेबी मकासरे, सुमन खरात, करुणा खरात ,लता खरात, गया बाई खरात, शशिकला जाधव, मनीषा बनसोडे, कौशल्या मस्के, गीता मकासरे ,नूतन सांजकर, पार्वती सोनवणे, वंसाबाई मकासरे, कडूबाई हिवाळे, कवताबाई रोटे, पंचशीला महिला मंडळ पंचशील नगर अमर महाल चेंबूर येथील महिला आजही याठिकाणी आजही उपोषण बसले आहेत. काय यांना घराचा बुद्ध विहार याचा अधिकार नाही का?सरकार व एस आर ए याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लागेल काय? की या लोकांचे मृत्यू बघतील असाही प्रश्न या अनुषंगाने निर्माण झाला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here