२४ तासांत कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. गेल्या २४ तासांत १३,५८६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने देशभरात चिंतेचे वातावरण आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांचा आकडा १२,५७३ वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ लाख ८० हजार ५३२ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६३ हजार २४८ एवढी आहे. तर २ लाख ४ हजार ७११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वांधिक रुग्ण आहेत. विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ सुरूच असून रोज हजार ते बाराशे रुग्ण सापडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here