गांजा तस्करी प्रकरणातील आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी केले जेरबंद

चोपडा, नंदलाल मराठे – गांजा तस्करी प्रकरणात औरंगाबाद पोलिसांना चकमा देत वेले ता.चोपडा येथील संशयित आरोपी गेल्या मार्च महिन्यांपासून फरार होता.सायकलवर गांजाची तस्करी करतांना औरंगाबाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीच्या चोपडा शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आज सकाळी ८ वाजता त्याला वेले ( ता.चोपडा) येथे त्याच्या राहत्या घरी त्याला अटक करण्यात येऊन औरंगाबाद शहर सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मध्य प्रदेशातून गांजा आणून त्याची मोटर सायकलवर तस्करी करतांना जशपाल रावतोडे रा.वेले (ता.चोपडा), विरेंद्रसिंग परदेशी, शुभम मोरे दोन्ही रा.औरंगाबाद, रामलाल बारेला रा.बोरअजंटी (ता.चोपडा) हे चौघे दि.१ मार्च २०२० रोजी औरंगाबाद शहरात पोलिसांच्या पथकाला आढळून आल्याने त्यांना रंगेहाथ मुद्देमालासह अटक करण्यात आली परंतू चोपड्याचे पोलीस पाहून यशपाल अमरसिंग रावतोडे हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मार्च महिन्यापासून फरार झाला होता.याबाबत औरंगाबाद शहरातील सिडको पोलिस स्टेशन गुरनं.११०/२०२० नुसार एन डी पी एस एक्ट कलम ८,२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून ४ पैकी ३ आरोपींना अटक करण्यात आली होती.तर एक आरोपी फरार घोषित करण्यात येऊन पोलीस त्याच्या मागावर होते.अखेर त्यास पकडण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here