अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा  करून तोडगा काढण्यासाठी प्रदीर्घ चर्चा

मुंबई (प्रतिनिधी अकबर मकरानी) – विख्यात कामगार नेते  अभिजीत राणे (संस्थापक महासचिव   – धडक कामगार युनियन) यांनी दिनांक २ सप्टेंबर, २०२०  रोजी एकात्मिय बाल विकास प्रकल्प गोरेगाव पूर्व, मुंबई येथील मुख्य सेविका / सुपरवायजर श्रीमती अक्षता पार्टे यांची मुंबई महानगर पालिका, सुंदर नगर आरोग्य केंद्र, पवन बाग  रोड, मालाड पश्चिम, मुंबई येथे त्यांचा कार्यालयात  भेट घेतली. अंगणवाडी मदतनीस व सेविका यांना नाहक मानसिक त्रास  दिला जात आहे  तसेच लॉकडाउन दरम्यानचे मासिक वेतन परत करण्यासाठी दबाव आणला जात  आहे, याबद्दल  प्रदीर्घ चर्चा  करण्यात आली.
या वेळी सौ. शीला जाधव, संतोष नगर वॉर्ड ४१ अध्यक्ष – अभिजीत राणे युथ फाउंडेशन, शोभा खरात, कल्पिता आंग्रे, सुप्रिया मयेकर, संगीता सोनावणे, सुभद्रा जाधव, जयश्री खरात, धडक कामगार युनियनचे ईशान्य मुंबई अध्यक्ष बबन आगडे, धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र जन संपर्कप्रमुख विनय डोळस, धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष महेश गुप्ता उपस्थित  होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here