शहादा ( विजय निकम) – सारंगखेडा येथील शेतात मजूर निंदणी काम करत असतांना मजुरास भला मोठा साप आढळून आला. त्यांनी त्वरित शेतमालक योगेश पाटील यांना सूचित केले.. त्यांनी सारंगखेडा येथील सर्पमित्र सागर राजपूत आणि निलेश नाईक यांना संपर्क केला.
सर्पमित्र सागर राजपूत,विशाल ठाकरे,निलेश नाईक,आकाश नाईक यांनी शेतात जाऊन बघितले असता तेथे जवळपास सहा ते सात फूट लांबीचा भारतीय अजगर साप असल्याचे निदर्शनास आले.आणि त्या सापास तोंडाजवळ एक जखम झालेली होती. त्यांनी अजगरास पकडून सुरक्षितपणे उपचारासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यालयात आणले त्यावर सर्पमित्र अविनाश पाटील यांनी उपचार केला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर निकुंभे उपाध्यक्ष भीमसेन रावताळे सचिव हितेश पाटोळे आदी उपस्थित होते. या नंतर वन विभाग दप्तरामध्ये नोंद करून अजगरास निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.







