प्रस्तावित संचमान्यता शिक्षकांच्या मुळावरच वर्धा येथे आंदोलन

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – शिक्षण आयुक्त पुणे यांनी 13 जुलै 2020 रोजी मा अप्पर मुख्य सचिव यांना सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिक्षकांचे पदे कमी होणार असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. म्हणून आज अजय भोयर नागपूर विभाग कार्यालय मंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ,तक्रार निवारण समिती जिल्हा वर्धाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री , शिक्षण राज्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा मार्फत निवेदन पाठवून तात्काळ प्रस्तावित संचमान्यताते मधील निकषांमध्ये दुरुस्ती करून शिक्षकांची पदे कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती जिल्हा वर्धाचे पुंडलिक नागतोडे, कुंडलिक राठोड, संजय बारी, अजय कोल्हे, संतोष महाजन, प्रभाकर उईके, नरेंद्र गोखले, राज धात्रक, भूषण डहाके, शरद वानखेडे, परमेश्वर केंद्रे, किशोर उमाटे, अविनाश धात्रक, संदीप चांभारे, विलास बरडे, जी एस गवळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here