निसर्ग-मित्र समिती औरंगाबादतर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समिती औरंगाबाद तर्फे कोरोना या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करतां गरीबांना मदत व कोरोना मुक्तसाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल गणोरी व फुलंब्री येथे कोरोना योद्धांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी निसर्ग-मित्र समितीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष लक्ष्मण साळूंखे यांनी कोरोनाच्या महामारीत प्रत्येकांनी मास्क लावावा, सँनिटायझरने किंवा साबणाने स्वच्छ हात धुवावेत,काळजी व दक्षता घ्यावी असे आवाहन केले, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ सतिष साबळे व इतर कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख, पर्यवेक्षक तथा निसर्ग मित्र समिती औरंगाबादचे अनेक पदाधिकाऱ्यांसह अरविंद राजहंस, नगराजसिंग परदेशी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here