रजनीकांत यांना अज्ञात नंबरवरुन धमकी

चैन्नई – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांच्या घरात बॉम्ब ठेवल्याची धमकी अज्ञात नंबरवरून आलेल्या फोनवरून देण्यात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रजनीकांत यांच्या घरी जाऊन तपास केला.
चेन्नईतील तेय्नाम्पेट पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पोलिस आणि बॉम्ब स्क्वॉडच्या एका टीमने रजनीकांत यांच्या घराची तपासणी केली असता हा बोगस कॉल असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, मागील काही दिवसांत अभिनेता रोहित रॉयने रजनीकांत यांच्यावर एक विनोद केला होता. त्यानंतर रोहित ट्रोल झाला होता. रोहितने सोशल मीडियावर एक जोक शेअर केला होता. त्यामध्ये लिहिले होते की, रजनीकांत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि आता कोरोनाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. रोहितचा हा अंदाज रजनीकांत यांच्या फॅन्सना आवडला नाही. त्यानंतर रोहितला ट्रोल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here