नवी मुंबईत ३८० मेट्रीक टन शासकीय रेशन तांदुळाचा काळया बाजारातील साठा जप्त

पनवेल (सहसंपादक ॲड. विष्णु गवळी) – दिनांक ३१/०७/२०२० रोजी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पनवेल, नवी मुंबई यांना पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील टेक केअर लॉजीस्टिक, पळस्पे येथील पलक रेशन गोडावुन येथे शासनाने कोवीड १९ या साथीच्या आजारामध्ये गोरगरीबांना पुरविण्यात येणारे रेशन धान्य गरजु लोकांपर्यंत पोहचवणेकामी वितरीत करण्यासाठी दिलेल्या रेशन मालाचा अवैधरित्या साठा करून परदेशात काळयाबाजाराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहीती मिळाली होती.
पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सह आयुक्त राजकुमार व्हटकर, नवी मुंबई व पोलीस उपआयुक्त अशोक दुधे, परिमंडळ २, पनवेल यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी/कर्मचारी व महसुल विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांनी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पनवेल यांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे टेक केअर लॉजीस्टिक, पळस्पे येथील पलक गोडावुन येथे जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपीनी आपसात संगनमत करून कट कारस्थान रचुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील व रेशन दुकानातील शासकीय नियंत्रित तांदुळ हा शासनाचे आदेशाचे उल्लंघन करून टेक केअर लॉजीस्टीक कंपनी पळस्पे येथे अवैद्य वाहतुकीद्वारे साठेबाजी करुन जमा केला. सदरचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदुळ हा भारतातुन परदेशात निर्यात करण्यासाठी त्याची अवैद्य रित्या साठवणुक करून शासनाची फसवणुक केल्याने सदर ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ११० मेट्रीक टन तांदुळ जप्त केला आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील जप्त तांदुळ हा महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणांवरुन आणला असल्याचे दिसून आल्याने पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांनी गुन्हयाचे तपासाकरीता पनवेल शहर पोलीस ठाणे कडील व नवी मुंबई गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन केले.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीस उप आयुक्त प्रविणकुमार पाटील, गुन्हे शाखा, नवी मुंबई व पोलीस उपआयुक्त अशोक दुधे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे तपासात विशेष तपास पथकाने आरोपी यांचे विविध कंपन्यामध्ये टाकलेल्या छाप्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एकुण २७० मेट्रीक टन तांदुळ जप्त कला आहे. आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणांवरुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील रेशनचा तादुळ आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीत यांनी विविध कंपन्या मार्फत भारतीय खादय निगमच्या (FCI) आएमएसएस मधील ई लिलावाव्दारे तांदूळ घेवन तो निर्यातीवर बंदी असताना विविध आफ्रिकन देशात पाठविला असल्याचे दिसून आले. आरोपींच्या कंपन्यामार्फत १ जानेवारी २०२० पासून आजपावेतो ३२,८२७ तांदुळ निर्यात केल्याचे आढळून आले. सदर गुन्हयातील जप्त तांदुळ कोठुन आणला याचा तपास असता तो कर्नाटक राज्यातील विविध सरकारी रेशन दुकानातुन आणल्याचे निष्पन्न झाल्याने विशेष तपास पथकाने कर्नाटक राज्यात जावुन तेथील आरोपीत रेशन दुकानदारांना ताब्यात घेवून गुन्हयात अटक केली आहे. गुन्हयाचे तपासात आजपावेतो एकुण १८ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी तीन आरोपींना अटक केली आहे. बाकी आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here