महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा सप्ताह’

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 ते 25 जून ‘सेवा सप्ताह’ आयोजित करणार आहे. या सप्ताहअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रदेशअध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
लॉकडाऊन जरी उघडले असले तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या ‘न्याय किट’ चे वाटप करण्याचा कार्यक्रम युवक काँग्रेस करणार आहे.
कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलिसखाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये कोरोना योद्द्यांचा सत्कार युवक काँग्रेस करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here