फेसमास्क न वापरणाऱ्या मुंबईकरांना दणका, महापालिकेने वसूल केले 27 लाख रुपये

ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) –  ‘कोविड – 19’ च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर ‘मास्क’ (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच ‘मास्क’चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये 1 हजार पर्यंत दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे ‘मास्क’ वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई 9 एप्रिल 2020 पासून नियमितपणे करण्यात येत आहे. या कारवाईचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून आता अधिकाधिक नागरिक ‘फेसमास्क’ वापरताना दिसून येत आहेत. 9 एप्रिल 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान ‘मास्क’ न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या 2 हजार 798 नागरिकांकडून रुपये 27 लाख 48 हजार 700 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here