बलात्कारातील आरोपी विपीन हसबनीस अटक करून पिडीत तरुणीला न्याय देण्याची चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी – स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याची बतावणी करून सांगली जिल्ह्यातील कडेगांव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार २८ वर्षीय पीडित तरुणीने शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार विपीन हसबनीस याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र आठ दिवस होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. राज्यात माहिला व मुलींवर बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाटत असून याप्रकरणी राज्य सरकारने कडक पावले उचलून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमुन बलात्कार पिडीत तरुणीला न्याय मिळवून देण्याची मागणी चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे दि ५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याचा बहाना करून सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस याने २८ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार कडेगांव पोलीस स्टेशन ला पिडीत तरुणीने दिली त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला . मात्र आठ दिवस होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही.
या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या गुन्ह्याचा तपास इस्लामपूर उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र अद्याप पर्यंत आरोपीला अटक झाली नाही. या उलट आरोपी राजरोसपणे पीडित तरुणीला स्वतः तसेच त्याच्या इतर साथीदाराकरवी दबावतंत्राचा वापर करून तसेच मोठ्या आर्थिक प्रभोलनाचे आमिषही दाखवून,तक्रार मागे घेण्या संबधी धमकावले जात आहे. अशी माहिती पिडीत तरुणीने मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याना दिली आहे. शेतच जर कंपून खात असेल तर न्याय कोणाकडे मागावा असाच प्रकार पिडीत तरुणीवर ओढावला आहे .पोलीस निरीक्षकच महाराष्ट्र पोलीस खात्याला कलंक आहे . आरोपी विपीन हसबनीस याला आठ दिवस होऊनही अटक होत नाही,अजूनही मोकाट फिरतोय ही अत्यंत लाजिरवाणी निषेधार्य बाब आहे . उलट अर्थी सांगली पोलीस बलात्कारी आरोपी विपीन हसबनिस याची पाठराखण करत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत निर्माण झाला आहे. वरील विषयाचे गांभीर्य पाहता पीडित तरुणीच्या जीवितास आरोपी विपीन हसबनिस याच्याकडून धोका निर्माण झाला आहे. पीडित
तरुणीच्या जीविताचे काही कमी जास्त घडल्यास याची संपूर्ण जबाबदारी शासनाची व महाराष्ट्र पोलिसांची राहील याची नोंद घ्यावी. आरोपी विपीन हसबनिस याची पार्श्वभूमी व घडलेल्या घटना पाहता आरोपी गेली आठ दिवस कोठे व कोणाकोणाच्या संपर्कात होता ? त्याला कोण पाठीशी घालत होते का ? पीडित तरुणीला धमकवणारे व दवाव आणणारे कोणकोण आहेत .? आरोपीकडे एवढी मोठी आर्थिक संपत्ती कोठून आली ? याची उच्च स्तरीय समिती नेमून सखोल चौकशीचे आदेश देऊन दोषी असलेले विपीन हसबनिस या आरोपीस त्वरित अटक करावी आणि या प्रकरणी न्यायालयात कायदेशीर बाबी योग्यप्रकारे मांडण्यासाठी व पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी .छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलेला आई चा दर्जा असताना पिडीत तरुणीवर अन्याय झाला न्याय मिळवून देण्यासाठी चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चा पीडित भगिनी सोबत आहे. लवकरात लवकर बलात्कारातील आरोपी ला अटक न झाल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दि ५ सप्टेंबर रोजी चाळीसगाव तहसीलदार यांच्या मार्फत चाळीसगाव मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे .
निवेदनाच्या प्रत माहितीस्तव अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , अनिल देशमुख, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य ,शंभूराजे देसाई, गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत, निवेदनावर गणेश पवार , अरुण पाटील, खुशाल मराठे ,अनिल जाधव, योगेश पाटील,छोटू अहिरे , भरत नवले ,स्पनिल गायकवाड,प्रदीप मराठे ,मिलींद जाधव,तुषार देशमुख यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here