- पालकमंत्री व गृहमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक नागपुर येथे संपन्न झाली..
- कोरोना प्रतिबंधासाठी आँनलाइन समन्वयाचा वापर करा.मुंबई चे आयुक्त आय.एस. चहल यांची सूचना
वर्धा (विदर्भ संपादक ॲड.चंद्रकांत कराळे) – कोरोना चा वाढता अभाव रोखण्यासाठी तपासणी करणे ,क्वारंटाइन करणे
आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिससूत्रीवर मुंबई मध्ये उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखिल झोन निहाय वाँर रूम तयार करून”एकछत्री समन्वयात” या या त्रिसूत्रींचा प्रभावी वापर करित कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढाकार घेऊन मुंबई च्या तज्ञ पथकाला पाचारण केले. या पथकात डाँ.हेमंत शहा, डाँ.राहुल पंडित, डाँ. मुजल लकडावाला, डाँ.गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथिल कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला. त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयुक्त चहल उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह आज दि.04.09.2020 रोजी नागपुरात दखल झाले. राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन बी.,पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी योगेश कुंभेजकर, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
नागपुरमध्ये करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात याव्यात,आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर करण्यात यावा,अँम्बुलन्सची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात यावी, खाजगी असो किंवा सरकारी प्रत्येक हास्पिटल मध्ये वाँर रुम उघडल्या गेली पाहिजेत.माहिती सदैव अद्यावत झाली पाहिजे, गंभीर रुग्णाच्या उपचारादरम्यान प्रत्येक द्रुश्य सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये साठ्वण्यात आले पाहिजे. प्रत्येक बाधितांचे विश्लेषण झले पाहिजे .नागपुरात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी अधिक वाढवाव्या, असे आव्हाहन त्यांनी यावेळी केले.







