शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलच्या शिक्षकांचे अभिनव अभियान : शिक्षक आपल्या घरी

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – यशवंतांची आणि गुणवत्तेची १०६ वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या घरी भेटी जाऊन विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्याचा ‘शिक्षक आपल्या घरी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
पी.आर.हायस्कूलने एप्रिल महिन्यापासूनच आॅनलाईन अभ्यासक्रमाला सुरूवात केली आहे.या अभ्यासाला पाच महिने झाले. विद्यार्थ्यांना आता शाळेची आणि शिक्षकांची ओढ लागली आहे, पण धरणगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अजून शाळा सुरू झालेल्या नाहीत. यासाठीच विद्यार्थीकेंद्रित पी.आर. हायस्कूलने ‘शिक्षक आपल्या घरी ‘ या अभियान सुरू केले आहे. सोशल डिस्टंन्शनचे पालन करुन पी.आर.हायस्कूलचे इंग्रजीचे व्यासंगी तथा ज्येष्ठ शिक्षक श्री. के.आर.वाघ आणि गणिताचे तज्ज्ञ शिक्षक श्री. यू. एस. बोरसे यांनी यांनी धरणगाव शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन केले.आॅनलाईन अभ्यास चेक केले. पालकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.पुढच्या टप्प्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घरी भेटी घेतल्या जात आहेत.
आपले शिक्षक घरी भेट द्यायला आलेले पाहून विद्यार्थी आनंदीत झाले. पालकांनीही समाधान व्यक्त केले. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन मुलं शाळेत जावेत, अशी प्रार्थना करण्यात आली.
या अभियानासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर, उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक आर. के. सपकाळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here