धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे आक्रमक कंगना रानावत जोडे मारो आंदोलन

  • पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले
  • त्वरित माफी मागावी- उपनगराध्यक्षा सौ.कल्पना महाजन

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथे अभिनेत्री कंगना राणावतनी महाराष्ट्र राज्य विषयी अपशब्द वापरण्याचा निषेधार्थ धरणगाव शिवसेना तर्फे जोडे मारो आंदोलन करून महिला आघाडी च्या वतीने सह्ययक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील.,व शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख आश्विनी भाटिया यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी निवेदनात अशी मागणी करण्यात आली की अभिनेत्री कंगना रानावत यांनी मुंबई पोलीस सह महाराष्ट्रातील १५ कोटी जनतेच्या अपमान केला आहे.तो आम्ही शिवसेना महिला आघाडी कदापिही सहन करणार नाही कंगना ने त्वरित माफी न मागितल्यास पुढील काळात शिवसेना स्टाईल ने पुन्हा आंदोलन करण्यात येईल असे आव्हान शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे यावेळी उपस्थित धरणगाव उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन,नगरसेविका अंजली विसावे, कीर्ती मराठे, आराधना पाटील, महिला आघाडी धरणगाव शिवसेना शहर प्रमुख रत्ना धनगर,अल्पसंख्याक तालुका प्रमुख मैना बाई शेख,नौशात मोमीन,ताहेरा शेख,सुनीता चौधरी, भारती चौधरी, माधुरी निलेश चौधरी, नेहा पाटील, स्वीटी चौधरी, नेहा जोशी, डॉली भंडारी व शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख पि.एम.पाटील सर.,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन,शिवसेना गटनेते पप्पु भाऊ भावे,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,नगरसेवक वासूदेव चौधरी,विजय महाजन,विलास महाजन,सुरेश महाजन,भागवत चौधरी,नंदकिशोर पाटील,अजय चव्हाण,राष्ट्रीय चर्मकार समाज कार्याध्यक्ष भानुदास विसावे.,युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन,लक्ष्मण महाजन,विशाल महाजन,बाळू जाधव,ऍड.शरद माळी,हेमंत चौधरी,वाल्मिक पाटील,गोपाल चौधरी,अरविंद चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here