खासदार – आमदारांनी सहा हजार कोटीचा कोरोना निधी उभारावा – सादिक खाटीक यांचे आवाहन

आटपाडी (प्रतिनिधी) – कोरोणा संकट निवारणासाठी महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या फंडातून प्रत्येकी ३ कोटी रुपये राज्य सरकारकडे द्यावेत, राज्य सरकारने लोकप्रतिनिधीं कडून उपलब्ध होणाऱ्या निधीत आपला दुप्पट निधी घालावा, मोठे उद्योग ,कारखानदार आणि सर्वच धर्मीयांच्या आर्थिक संपन्न धार्मीक स्थळाकडून राज्य सरकार एवढाच निधी गोळा करून या निधीतून राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तातडीने सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार आणि मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविलेल्या ई मेल निवेदनाद्वारे राज्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींना सादिक खाटीक यांनी आवाहन केले आहे .
या निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , विधानसभा सभापती नानाजी पटोले , विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर , विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, मंत्री जयंतराव पाटील ,बाळासाहेब थोरात, राजेश टोपे , राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठविल्या आहेत .
राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्री महोदयांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यातील तमाम जनतेच्या वतीने करीत असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी या निवेदनात , राज्यातील कोरोणाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे , या संकटाला सर्वांनी मोठ्या एकजूटीने सामोरे जाणे गरजेचे आहे. सर्वच बाजूनी कोलमडू लागलेल्या, आर्थिक कोंडमाऱ्यातून भयभीत झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी , शासनकर्त्यांनी, उद्योग , कारखानदार आणि धार्मीक स्थळांच्या व्यवस्थापनाने एकजूटीने मोठ्या ताकदीनिशी पुढे आले पाहीजे .
महाराष्ट्र विधानसभेतील २८८ सदस्य, विधान परिषदेतील रिक्त जागा सोडून ६६ सदस्य, राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेले ४८ सदस्य आणि राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे १९ सदस्य असे सुमारे ४२१ सदस्यांकडून त्यांच्या एकूण कालावधीतल्या आमदार, खासदार फंडा पैकी प्रत्येकी ३ कोटी रुपये संकलीत केल्यास १२६३ कोटी रुपये उपलब्ध होतील, कोव्हीड साठीच्या या वेगळ्या विशेष निधीत राज्य सरकारने या रकमेचे दुप्पट म्हणजे २५२६ कोटी स्वतःचे घालावेत आणि राज्यातील सर्व धर्मीयांच्या आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या धार्मीक स्थळांमधून तसेच मोठे उद्योग कारखानदार यांच्याकडून राज्य सरकार एवढेच २५२६ कोटी रुपये गोळा करून एकूण जमणाऱ्या ६३१५ कोटी निधीतून सर्व जिल्हा, तालुका स्तरावर कोरोणाचा सामना करण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी . या निधीतून राज्यातल्या ३६ जिल्हयाला प्रत्येकी सुमारे १७५ कोटी रुपये वेगळे म्हणजेच ३५८ तालुक्यांना प्रत्येकी सुमारे १७ कोटी रुपये वेगळे उपलब्ध होवू शकतील .यासाठी राज्य सरकार, राज्यातील सर्व पक्षाचे नेते मंडळीनी, उद्योगपती, कारखानदार, धार्मीक व्यवस्थापनांनी एकजूटीने आणि तातडीने निर्णय घेतला पाहीजे.
कोरोणाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महात्मा फुले योजने अंतर्गत १ लाख रुपयाची तरतूद करावी . ही सुविधा खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वच गंभीर रुग्णांना मिळाली पाहीजे . उपचारासाठी लागणारी सर्व औषधे, महागडी इंजेक्शन , इतर लागणाऱ्या सुविधा मोफत दिल्या गेल्या पाहीजेत . उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक, परिचारीका कर्मचारी यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा तातडीने उपलब्ध झाल्या पाहीजेत . प्रतिकारशक्ती वाढीस लागेल असा सात्वीक आहारही रुग्णांसह सेवेतल्या सर्वांना मोफत पुरविला पाहीजे. शासनाने प्रत्येक कोरोणा रुग्णाचा किमान २५ लाखाचा विमा उतरला पाहीजे .राज्याचे मुख्य संकट म्हणूनच याला सामोरे जाताना कोरोणा आजार हा धनदांडग्यांनी आणलेला असल्याने निष्पाप सामान्य माणसांवर विशेष मेहेरनजर दाखविली गेली पाहीजे . राज्यातल्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्स, इतर आरोग्य कर्मचारी यांचाही या युद्धजन्य स्थितीत उपयोग करून घेतला पाहीजे .राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या ,शहरातल्या आता असलेल्या काही गोष्टींमध्ये सुधारणा केलेस लाखो लोकांना त्याचा लाभ होणार आहे. वाढती कोवीड रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि काही ठिकाणचे अपवाद वगळता राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये २५० खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्याची गरज वाटत आहे. कोरोणाचे संकट मोठ्या प्रमाणात ओढवलेल्या अनेक तालुक्यात, शहरात सध्या असलेली खाटांची संख्या अपुरी पडत आहे.अनेक तालुक्यातल्या शेकडो गावात लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले जात असलेतरी सौम्य व मध्यम लक्षणाच्या रुग्णांसाठी अतिरिक्त सोय करणे गरजेचे आहे. कोरोणा संकट गहीरे होत चाललेल्या प्रत्येक तालुक्यात गंभीर रुग्णांसाठी ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची सोय करणे गरजेचे आहे. किमान १० खाटांसाठीची ventilater ची सोय करणे आवश्यक आहे . Covid रुग्णांच्या निदानासाठी डिजिटल x-ray ची सोय आवश्यक आहे . रक्त व लघवी तपासणीसाठी cell counter, biochemistry analysen, urine analyser ची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी दोन Advanced cardiar ambulance ची अत्यंत आवश्यकता असून ७५ Bed side monitor ची आवश्यकता आहे. प्रत्येक ठिकाणी Central oxygen व मोठे oxygen cylinder ची आवश्यकता आहे. तसेच २५ High flow oxygenmeter ची आवश्यकता आहे.सध्या कार्यरत असणाऱ्या MD Doctor यांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करणे गरजेचे आहे.वरील सर्व गोष्टी कार्यान्वित करण्यास प्रत्येक तालुका स्तरावर ५ एम. डी. डॉक्टर्स, २० बी ए एम एस , एमबीबीएस डॉक्टर्स, ६० परिचारिका इत्यादी मेडिकल व पॅरामेडिकल स्टाफ आवश्यक आहे.यासोबत परिचर व सफाई कामगारांची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक एक सिटीस्कॅन मशिन त्याला लागणारा ऑपरेटर आणि दोन तालुक्यांमध्ये एक रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देणे अतिशय गरजेचे आहे.तसेच नवीन जुन्या खाटांच्या प्रमाणात गरजेच्या सर्वच ठिकाणी पुरेशा staff व इतर साहित्याची अति आवश्यकता असून या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत . गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सीजन निर्मितीचा मोठा प्रकल्प तातडीने उभारला गेला पाहीजे . कोव्हीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्वच रुग्णालयातील अपडेटस मध्यवर्ती ठिकाणी कोणालाही उपलब्ध होतील अशी आणि कोरोणाच्या चाचणी करणाऱ्या सर्व यंत्रणा २४ तास कार्यान्वीत राहतील अशी व्यापक यंत्रणा उभारली गेली पाहीजे असेही शेवटी सादिक खाटीक यांनी नमुद केले आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here