जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – आज दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्व.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकभाऊ लाडवंजारी,प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री पन्नालाल वंजारी ,मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी सर,श्री संतोष चाटे,राहुल लष्करे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाथ फाऊंडेशनच्या वतीने श्रीराम माध्यमिक विद्यालयातील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक ,शिक्षक,कर्मचारी यांचा नारळ,रुमाल,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.ओबीसी समाजाचे महाराष्ट्राचे भाजप जेष्ठ लोकनेते मा.श्री एकनाथराव खडसे साहेबांनी सर्व शिक्षकांशी फोनवर बोलून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मा.श्री एकनाथराव खडसे साहेब(मा.महसूल,कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य)यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात ऑनलाईन
निबंध,चित्रकला,वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या,त्यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गहू तांदळाचे वाटप संस्थेच्या अध्यक्षांच्या तसेच आयोजक अध्यक्ष नाथ फौंडेशन श्री अशोकभाऊ लाडवंजारी,मुख्याध्यापक श्री दिवाकर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारे 5 सप्टेंबर “शिक्षक दिन”साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रतिभा पाटील यांनी तर आभार श्री अतुल चाटे यांनी केले.







