- जळगाव जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती
- आजही जळगाव शहरात सर्वाधिक २४० कोरोनाबाधित
जळगाव (प्रतिनिधी) – आज शनिवारी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ९११ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांची सातत्याने वाढती संख्या ही चिंताजनक असून, वाढता संसर्ग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या ३१ हजार ६६० झाली आहे. सर्वाधिक २४० रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात ५१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या ९११ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर २४० , जळगाव ग्रामीण ४१, भुसावळ ५४, अमळनेर १०२, चोपडा ८२, पाचोरा ४४, भडगाव १०, धरणगाव ८ , यावल १३, एरंडोल ६९, जामनेर ५३, रावेर ५४, पारोळा ४३, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ४, बोदवड १०, इतर जिल्ह्यातील ९ असा समावेश आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ३ तर एरंडोल तालुक्यात २ तर जामनेर, यावल, भुसावळ या तालुक्यांत प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







